Next

नाशिकमध्ये तीन फूट उंचीच्या वधू-वराचे शुभमंगल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 14, 2018 09:05 PM2018-03-14T21:05:30+5:302018-03-14T21:06:31+5:30

पिंपळगाव बसवंत : विवाह म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन, सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण अन् सासर-माहेरच्या नात्यांची ...

पिंपळगाव बसवंत : विवाह म्हणजे दोन जिवांचे मधुर मिलन, सनई चौघड्याच्या मंजुळ स्वरात नवजीवनात केलेले पदार्पण अन् सासर-माहेरच्या नात्यांची मंगळसूत्रात केलेली पवित्र गुंफण...अशी विवाहाची व्याख्या केली जात असली तरी पिंपळगाव बसवंत येथे बुधवारी झालेल्या केवळ तीन फूट उंचीच्या वधू-वराच्या विवाह सोहळ्याची चर्चा चांगलीच रंगली. दोघांना आशीर्वाद देण्यासाठी व-हाडी मंडळींनी गर्दी केली होती. येथील प्रमिला लॉन्स येथे दि.१४ मार्च रोजी केवळ तीन फूट उंची लाभलेले वधू व वराचा हा शुभविवाह अगदी राजेशाही थाटात झाला.

टॅग्स :नाशिकNashik