नाशिक - पर्यटकांच्या पसंतीस उतरणाऱ्या भंडारदऱ्यात सध्या पर्यटकांची गर्दी उसळली आहे ती केवळ आंब्रेला धबधबा बघण्यासाठी... भंडारदरा धरणातून जायकवाडीसाठी विसर्ग सुरू असल्याने आंब्रेला खळाळून वाहत आहे. धरणातील पाणी भिंतीलगत असलेल्या एका गोलाकार उंच खडकावर पडत असल्यामुळे हा धबधबा छत्रीच्या आकाराचा भासतो. त्यामुळे 'आंब्रेला' नावाने धबधबा लोकप्रिय झाला आहे. ( व्हिडीओ - अझहर शेख)