नाशिक- अवघ्या नाशिककरांची डोकेदुखी ठरलेल्या त्र्यंबक नाका ते अशोकस्तंभ स्मार्ट रोडचे काम भर पावसात पूर्ण करण्यासाठी ठेकेदाराने अजब शक्कल लढविली असून चक्क मंडप टाकून काम सुरूच ठेवले आहे. नाशिक महापालिकेची स्मार्ट सिटी अंतर्गत निवड झाल्यानंतर शहरातील त्र्यंबक नाका ते अशोक स्तंभ दरम्यान रस्त्याचे अवघ्या एक किलो मीटर रोडचे स्मार्ट रोडमध्ये रूपांतर करण्यास प्रारंभ झाला आहे अवघ्या एक किलोमीटर रस्त्यासाठी 21 कोटी रुपये खर्च करीत आहे या रस्त्यावर जिल्हाधिकारी कार्यालय, कोर्ट अशी अनेक शासकीय कार्यलये तसेच तीन शाळा दुकाने आणि घर आहेत अत्यंत रहदारीच्या या मार्गावरील एक किलोमीटर रस्त्याचे काम दोन वर्षांपासून सुरू असून नाशिककरांनी आंदोलने केली आहेत. 1 एप्रिल पासून या रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला 36 हजार रुपये दररोज असा दंड सुरू आहे आणि 31 ऑगस्ट अशी डेडलाईन देण्यात आली आहे. त्यामुळे धावपळ करून कसेही हे काम पूर्ण करण्यासाठी स्मार्ट रोडच्या ठेकेदाराने अजब शक्कल लढविली असून सुमारे 500 मीटर अंतराचा मंडप टाकून भर पावसात काम सूरु केले आहे त्यामुळे हा चर्चेचा विषय ठरला आहे.