'इमामशाही’च्या ताबुताचे कारागिर मुस्लीम तर खांदेकरी हिंदू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 04:01 PM2018-09-20T16:01:28+5:302018-09-20T16:34:58+5:30
अझहर शेख नाशिक : धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक ...
अझहर शेखनाशिक : धार्मिक सण-उत्सव, यात्रा म्हटलं की त्यासोबत परंपरा असतेच अन् अशा पारंपरिक प्रथांमधून भारताची एकात्मता अधिकाधिक बळकट होताना दिसून येते. नाशिकच्या ‘इमामशाही’ दर्गा परिसरात दरवर्षी होणारा मोहरमचा उत्सव अन् त्याची परंपरा राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतीक मानली जाते. येथे अळीवच्या बियांपासून मुस्लीम कुटुंबीय हिरवळीचा ताबूत तयार करतात अन् आशुरा’च्या दिनी अर्थात मोहरमला हिंदू कोळी बांधव या ताबुताचे खांदेकरी होतात, यावेळी जातीधर्माच्या सर्व भिंती भेदल्या जातात अन् जातीय सलोख्याचे दर्शन घडते. शुक्रवारी (21 सप्टेंबर) दर्ग्याच्या आवारात यात्रा भरणार असून ताबूत दर्शनासाठी दूपारी चार वाजेनंतर मैदानात हिंदू भाविक घेऊन येतील.