नाशिक : जिल्हा रुग्णालय परिसरात मागील बाजूस बांधकाम सुरू आहे, तेथे एक दहा ते पंधरा फूट खोल खड्ड्यात रात्रीच्या सुमारास सुमारे 65 वर्षीय जेष्ठ कोसळले. रात्रभर बाबा या खड्यात पडून होते. सकाळी मागील बाजूस स्वच्छता करण्यास गेलेल्या कामगाराच्या हे निदर्शनास आले. त्याने क्षणाचा विलंब न करता अग्निशामक दलाला कळविले. सब स्टेशन ऑफिसर दीपक गायकवाड हे पथकासह घटनास्थळी पोहचले आणि जवानांनी खड्यात शिडी टाकून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. झोपलेल्या अवस्थेत पडून असलेल्या बाबांना जागे करत जवान इसहाक याने शिडी वरून सुखरूप बाहेर काढले. तत्काळ त्यांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. नाशिक शहरात पाऊस नसल्याने खड्यात पाणी साचलेले न्हवते अन्यथा दुर्दैवी घटना घडली असती. (VIDEO - अझहर शेख)