Next

गोदावरीच्या पुरात असा वाहून गेला युवक; सूर लगावण्याची लागली होती पैज

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2019 10:29 PM2019-08-05T22:29:49+5:302019-08-05T22:30:01+5:30

मुलगा बुडल्याचे समजताच आई, आजीसह अन्य नातेवाईकांनी गोदकाठी येऊन टाहो फोडला.

- अझहर शेख नाशिक : चौघे मित्र बाजार समितीमधून मोलमजुरी करून पूर बघायला गोदावरी नदीवर आले, कोण अगोदर सूर लागवणार यासाठी चढाओढ लागते...आकाश लोंढे हा अतिउत्साही तरुण सूर फेकतो...त्यानंतर त्याचे तीन मित्र उडी घेतात... तिघे संत गाडगेबाबा धर्मशाळेपर्यंत जातात अन तेथूनच नदीतून बाहेर येतात मात्र आकाश पाण्याच्या प्रवाहात सापडून गटांगळ्या खात थेट पुढे वेगाने तापोवणाच्या दिशेने वाहून गेला....त्याचा सायंकाळी उशिरापर्यंत अग्निशमन दलाच्या बचवपथकाला थांगपत्ता लागला नाही. मुलगा बुडल्याचे समजताच आई, आजीसह अन्य नातेवाईकांनी गोदकाठी येऊन टाहो फोडला.