भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांची तुरुंगातून सुटका
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2019 13:49 IST2019-06-30T13:48:29+5:302019-06-30T13:49:11+5:30
पालिका प्रशासनातील अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण करणाऱ्या भाजपा आमदाराला जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. भाजपा आमदार ...
पालिका प्रशासनातील अधिकाऱ्याला बॅटनं मारहाण करणाऱ्या भाजपा आमदाराला जामीन मिळाल्यानंतर कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे काढले. भाजपा आमदार आकाश विजयवर्गीय यांना जामीन मिळाल्यावर त्यांच्या समर्थकांनी हवेत गोळीबार करुन आनंद साजरा केला. विशेष म्हणजे इंदूरमधील भाजपा कार्यालयासमोर हा प्रकार घडला.