मुजफ्फरनगर - भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी यांनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केलं आहे. भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि त्यांच्या कुटुंबीयांबाबत विक्रम सिंह सैनी यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. पंडित नेहरु हे अय्याश होते. त्यांचे कुटुंबही अय्याश आहे. इंग्रजांच्या नादाला लागून नेहरुंनी देशाचं विभाजन केलं. राजीव गांधी यांनी इटलीत लग्न केलं, यांची सगळी कामं अशीच आहे अशा शब्दात भाजपा आमदार विक्रम सिंह सैनी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मात्र भाजपा आमदाराच्या या वादग्रस्त विधानामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.