Next

इस्रो प्रमुख के. सिवन झाले भावूक; पंतप्रधान मोदींनी दिला धीर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 02:13 PM2019-09-07T14:13:25+5:302019-09-07T14:31:27+5:30

चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता. भारताला तुमचा अभिमान आहे. मी तुमची ...

चांद्रयान 2 मोहीमेचा अखेरचा टप्पा अपेक्षेनुसार झाला नाही तरीही त्याचा प्रवास शानदार होता. भारताला तुमचा अभिमान आहे. मी तुमची मनस्थिती जाणतो, निराश होऊ नका.  देशाच्या प्रगतीमध्ये शास्त्रज्ञांचं योगदान अफाट आहे, जे कोणीच विसरू शकणार नाही असं म्हणत पंतप्रधान मोदींनी सर्व शास्त्रज्ञांचं मनोबल वाढवण्याचा प्रयत्न केला. विज्ञानात प्रयोग असतात, अपयश नाही असं पंतप्रधान  नरेंद्र मोदी  यांनी म्हटलं आहे. यावेळी  इस्रो  प्रमुख के. सिवन भावूक झाल्याने त्यांना अश्रू अनावर झाले. त्यामुळे पंतप्रधान मोदींनी त्यांना जवळ घेत मिठी मारली, तसेच धीर दिला आहे.