लडाखमध्ये चिनी ड्रोन, Utrakhandमध्ये घुसखोरी | LAC वर स्थिती नाजूक | Chinese Drones in ladakh
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2021 11:08 AM2021-09-29T11:08:08+5:302021-09-29T11:08:38+5:30
LACवर चीननं पुन्हा डोकं वर काढलंय. प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर चीनने 50 हजारांहून अधिक सैनिक तैनात केलेत. भारतीय चौक्यांच्या खूप जवळून ड्रोन उडवले जातायंत. या भागात मोठ्या प्रमाणावर चीनकडून ड्रोनचा वापर सुरु झालाय. इतकंच नाही तर सीमेजवळ लढाऊ विमानांसाठी तळ तयार करण्यात येतायंत आणि या तळांवर शस्त्रास्त्रं तैनात करण्यात आलीयेत. लडाखमध्ये ड्रोन वाढवणाऱ्या चीननं उत्तराखंडमध्येही घुसखोरी केल्याची माहिती मिळतेय. उत्तराखंडमध्ये चीनी सैन्य तब्बल ५ किलोमीटर आत घुसलं होतं, असं सांगितलं जातंय. बॉर्डरवर चीन काय करतोय, जाणून घ्यायचंय पुढच्या ३ मिनिटात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा