मूर्खपणाचा कळस; धावत्या ट्रेनसमोर सेल्फी घेण्याचा नाद तरुणाच्या अंगलट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2018 15:38 IST2018-01-25T11:25:27+5:302018-01-25T15:38:59+5:30
काहीतरी हटके करण्याच्या नादात जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या कमी नाही. रेल्वेरुळावर, धावत्या रेल्वेत स्टंट करण्याचे प्रकार होत असता
हैदराबाद : काहीतरी हटके करण्याच्या नादात जीव धोक्यात घालणाऱ्यांची संख्या कमी नाही. रेल्वेरुळावर, धावत्या रेल्वेत स्टंट करण्याचे प्रकार होत असतात, यात अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. गंभीर दुखापत होते, कायमस्वरुपी अपंगत्वही स्टंटबाजीमुळे येते. असाच सेल्फी स्टंट करण्याच्या नादात हैदराबादमध्ये एकाला थेट दवाखान्यात दाखल व्हावे लागले.