शिमल्यातील कालका टॉय ट्रेन सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू ठरली आहे. ज्या परिसरातून ही टॉय ट्रेन जाते तिथे बर्फवृष्टी झाल्याचा सुंदर नजारा पाहायला मिळत आहे. या निसर्गसौंदर्याचा एक व्हिडीओ रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्वीट केला आहे. जम्मू-काश्मीर आणि हिमाचल प्रदेशमध्ये सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे.