कर्नाटकातील कोप्पळमध्ये एका महिलेवर दारुच्या अतीसेवनाने उपचार सुरु आहेत. मात्र, हालाखीची परिस्थिती असल्याने तिची सहा वर्षांची मुलगी गेल्या आठवड्यापासून भीक मागून आईवर उपचार आणि तिच्या खाण्याचा बदोबस्त करत आहे. ही बाब राज्याच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या निदर्शनास आणून दिल्यावर सूत्रे हलली असून या महिलेवरील उपचाराचा आणि चिमुरडीच्या शिक्षणाचा खर्च या विभागाकडून करण्यात येणार आहे.