केंद्रीय राज्यमंत्री साध्वी निरंजन ज्योती यांचा पट्टाभिषेक
By किरण अग्रवाल | Published: January 14, 2019 12:50 PM2019-01-14T12:50:43+5:302019-01-14T13:01:22+5:30
केंद्रीय मंत्री असताना महामंडलेश्वर बनणाऱ्या निरंजन ज्योती पहिल्याच मंत्री आहेत. मंत्र जप व नमो पार्वती पतेच्या घोषात पट्टाभिषेक प्रक्रिया पूर्ण झाली.
प्रयागराज - केंद्रीय मंत्री असताना महामंडलेश्वर बनणाऱ्या निरंजन ज्योती पहिल्याच मंत्री आहेत. मंत्र जप व नमो पार्वती पतेच्या घोषात पट्टाभिषेक प्रक्रिया पूर्ण झाली. आखाडा नेहमी महिलांचा सन्मान करीत आल्याचे सांगत निरंजनी आखाडा, आनंद आखाडा, महानिर्वानी, अटल, अग्नी, जुना उदासीन, निर्मल आदी आखड्यातर्फे विविध महंतांहस्ते चादर पांघरून साध्वी निरंजन ज्योतींचा सन्मान करण्यात आला. आखाडा परिषद सचिव महंत हरीगिरीजी, गजाचरणजी (गुजरात), मा नंदाकिनी जी, आत्मचेततनानंद जी, आशुतोषानंद गिरी (काशी), अनंत देवगिरीजी, प्रेमानंद महाराज, गजानंदगिरी जी, आदित्य गिरी (गुजरात), हरिओम गिरी, मंजू श्री जी ( नोएडा), प्रशांत गिरी (पटियाला), आदी संताची मोठी उपस्थिती होती.