लोकसभा निवडणुकीत सपाटून हार पत्करावी लागल्याचा परिणाम आत राज्या राज्यांत दिसू लागला आहे. काँग्रेसच्या नेत्यांना पक्षात राहणे धोक्याचे वाटू लागले असून सत्ताधारी पक्षामध्ये जाण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तेलंगणामध्ये चंद्रशेखर राव यांच्या पक्षात काँग्रेस विधीमंडळ पक्ष विलीन करण्याचे पत्रच 12 आमदारांनी दिले आहे.