पणजी - गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी (17 मार्च) संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंधित कर्करोगाशी झुंज देत होते. पर्रीकर यांच्या जाण्याने समाज आणि पक्षाची कधीही न भरून येणारी हानी झाली असल्याचं भाजपाचे अध्यक्ष अमित शहा यांनी म्हटलं आहे.