उत्तर प्रदेशच्या गोंदा जिल्ह्यामध्ये आरोग्य केंद्रातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गरोदर महिलेल्या प्रसूतीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र रुग्णालयात डॉक्टर आणि कर्मचारी उपस्थित नव्हते. महिलेची प्रकृती खालावत असल्याने नातेवाईकांनी तेथेच प्रसूती करण्याचा निर्णय घेतला. मात्र रुग्णालयाचा या निष्काळजीपणामुळे महिला आणि बाळाच्या जीवाला धोका निर्माण झाला असता. याप्रकरणाचा अधिक तपास करण्यात येत असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.