प्रचंड प्रमाणात वाढलेले वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी विविध उपाययोजनांची घोषणा केली. त्यात प्रामुख्याने खासगी वाहनांसाठी सम-विषम योजनेची पुन्हा अंमलबजावणी केली जाणार आहे. येत्या ४ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत वाहनांवर निर्बंध आणणाऱ्या या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे. मात्र मनोज तिवारी यांनी हा एक राजकीय स्टंट असल्याचे म्हणत केजरीवाल यांच्या सरकारवर टीका केली आहे.