सर्जिकल स्ट्राईकझाल्यानंतर संरक्षण दलाच्या प्रमुखांनी आधी पाकिस्तानला याबाबत कळविले, नंतर प्रसारमाध्यमे, देशाला सांगितले. मात्र, यावर नाही सरकारचा कोणता मंत्री बोलला होता नाही पंतप्रधान. मात्र, त्याच दिवशी विरोधी पक्षांनी या स्ट्राईकवर संशय व्यक्त केला. आणि त्यांच्या आरोपांना वजन आणण्यासाठी पाकिस्तानच्या वक्तव्यांची मदत घेतली होती. तेच पाकिस्तानला हवे होते. या ऑपरेशनवेळी मी थेट संपर्कात होतो, असा खुलासा पहिल्यांदाच मोदी यांनी केला.