रांची - सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तरुणीला कोर्टाने कुराण वाटण्याची शिक्षा दिली आहे. धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणाच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या रुचा भारती या तरुणीला रांची कोर्टाने ही शिक्षा सुनावली आहे. न्यायालयाने तिला ५ कुराण शाळा, विद्यालय किंवा महाविद्यालयात दान करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला आहे.