Next

तेजस भरारीचा अनुभव अतिशय थ्रिलिंग- राजनाथ सिंह

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2019 18:40 IST2019-09-19T18:39:51+5:302019-09-19T18:40:08+5:30

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानामधून उड्डाण केले. तेजय विमानातून उड्डाण करणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ...

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज संपूर्ण भारतीय बनावटीच्या तेजस लढाऊ विमानामधून उड्डाण केले. तेजय विमानातून उड्डाण करणारे राजनाथ सिंह हे पहिले संरक्षणमंत्री ठरले आहेत. तेजसमधून उड्डाण करणे हा सुखद अनुभव असल्याचे मत  राजनाथ सिंह यांनी उड्डाणानंतर व्यक्त केले. तेजसमधून अर्धा तास उड्डाण करून माघारी परतल्यावर राजनाथ सिंह म्हणाले की, ''तेजसमधून उड्डाण करणे हा सुखद अनुभव आहे. हे विमान उत्तम आणि आरामदायक आहे. मी या उड्डाणाचा आनंद घेतला. अशा विमानाच्या निर्मितीसाठी मी एचएएल, डीआरडीओ आणि इतर संस्थांचे अभिनंदन करतो. आज आपण या विमानांची जगातील इतर देशांमध्ये निर्यात करण्याच्या स्तरापर्यंत पोहोचलो आहोत.''