नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सुरू केलेल्या ‘ स्वच्छ भारत अभियान’ अंतर्गत स्वच्छता मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. शनिवारी संसद परिसरात भाजपाचं स्वच्छता अभियान पाहायला मिळालं. भाजपाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमा मालिनी यांच्यासह भाजपा दिग्गज मंत्र्यानी संसद परिसरात स्वच्छता मोहीम राबवली.