कोलकाता: शारदा चिटफंड घोटाळ्याच्या चौकशीसाठी कोलकाताचे पोलीस आयुक्त राजीव कुमार यांच्या घरावर छापा टाकण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने बंगालमध्ये अभुतपूर्व परिस्थिती निर्माण झाली आहे. या प्रकारानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी केंद्र सरकार आणि सीबीआयविरोधात आंदोलनास सुरुवात केली आहे.