नवी मुंबई : प्रांतवादाचे राजकारण करून काही राजकीय पक्षांनी उत्तर भारतीय नागरिकांना यापूर्वी मारहाण केली. त्यांचे ठेले तोडले. अशाप्रकारे राजकारण करणाऱ्या पक्षांचा या निवडणुकीमध्ये अंत करणार असल्याची टीका भाजप खासदार मनोज तिवारी यांनी केली. नाव न घेता त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.