Asian Games 2018: द्युती चंदची ऐतिहासिक कामगिरी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 30, 2018 01:17 PM2018-08-30T13:17:58+5:302018-08-30T13:18:12+5:30
भारताची धावपटू द्युती चंदने देशाला रौप्यपदक पटकावून दिले आहे. महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने दुसरा क्रमांक पटकावला आणि ...
भारताची धावपटू द्युती चंदने देशाला रौप्यपदक पटकावून दिले आहे. महिलांच्या 200 मी. धावण्याच्या शर्यतीमध्ये द्युतीने दुसरा क्रमांक पटकावला आणि देशाला रौप्यपदक मिळवून दिले. आशियाई क्रीडा स्पर्धेतील तिचे हे दुसरे पदक ठरले. एकाच आशियाई स्पर्धेत 100 मी. व 200 मी. शर्यतीत पदक जिंकणारी ती चौथी भारतीय खेळाडू ठरली. याआधी लेव्ही पिंटो, आर. ज्ञानसेखरण, पी.टी.उषा यांनी हा विक्रम केला होता.