भारताच्या हिमा दासकडून रौप्यपदकाची कमाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2018 20:56 IST2018-08-26T20:55:26+5:302018-08-26T20:56:17+5:30
भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली.
भारताच्या हिमा दासने 400 मीटर शर्यतीत 50.79 सेकंदाची वेळ नोंदवून रौप्यपदकाची कमाई केली.नुकत्याच झालेल्या जागतिक अॅथलेटिक्स स्पर्धेत ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकणाऱ्या 18 वर्षीय हिमाची ही पहिलीच आशियाई स्पर्धा होती आणि त्यात तिने रौप्यपदक जिंकले. याच गटात भारताच्या निर्मलाला चौथ्या स्थानावर समाधान मानावे लागले. हिमाने या कामगिरीसह राष्ट्रीय विक्रमही नोंदवला.