केसांना फाटे फुटण्यापासून कास वाचवता येतील? Split Ends | Get strong and healthy hair | Hair growth
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2021 01:42 PM2021-07-16T13:42:50+5:302021-07-16T13:43:04+5:30
केसांना फाटे फुटणं अर्थात स्प्लिट एंड्स हेअर म्हणजे केस खालून दोन भागात विभागले जातात. अर्थात ही एक नेहमीची समस्या आहे. यामुळे केस अगदीच कोरडे आणि वाईट होतात. तुम्हाला माहितीये का कि केसांना फाटे फुटत असतील तर केसांची वाढच थांबून जाते... तुम्हाला जर लांबसडक केस हवे असतील तर तुम्हाला या split ends पासून सुटका मिळवायलाच हवी... याशिवाय split ends मुळे तुमच्या केसांचं सौंदर्यही नाहीसं होतं. बऱ्याचदा केसांना फाटे फुटल्यानंतर केस कापण्याचा अथवा ट्रीम करण्याचा सल्ला देण्यात येतो. पण आपण स्वतः तर केस सतत कापू शकत नाही आणि पार्लरमध्ये सारखं सारखं जाणं हेदेखील परवडण्यासारखं नाही. म्हणूनच आपण घरच्या घरी आपल्या केसांनाची योग्य ती काळजी घ्यायला हवी... हो ना? चला तर मग मुद्द्यावर येउयात... सर्वात आधी जाणून घेऊयात , केसांना फाटे फुटण्याची कारणं- जाणून घेऊयात या व्हिडिओमधून -