केसांचा भांग बदलल्याने केसांचं तुटणं थांबतं? Hair Parting Can Be A Reason | Hairfall | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2021 11:01 AM2021-01-04T11:01:41+5:302021-01-04T11:02:24+5:30
तापर्यंत तुम्ही केसांसाठी कितीतरी हेअर प्रॉडक्ट्सचा वापर केला असेल आणि हेअर स्टाईलही केल्या असतील. पण तुम्ही कितीतरी वर्ष आपल्या केसांचा भांग बदलला नसेल. आता तुम्हाला वाटेल की भांग बदलण्याचा काय संंबंध? पण भांग न बदलण्याने खूप फरक पडतो. भांग बदलण्याने तुमच्या केसांचे मूळ हे व्यवस्थित श्वास घेऊ शकतात. लहान सहान केस जे गळतात ते प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत मिळते. त्यामुळे हेअर पार्टिंग बदलणे अत्यंत गरजेचे असते आणि हे केसांसाठी फायदेशीर ठरते. हेच नाही तर भांग बदलण्याने तुमचा लुकही लगेच बदलतो. चेहऱ्यातही फरक पडतो. तुम्ही जर साईड पार्टिंग अर्थात बाजूने भांग काढत असाल तर तुमच्या केसांचा व्हॉल्युमही बदलतो आणि चांगला व्हॉल्युम मिळतो. अजून काय काय फायदे होतात केसांचा भांग पाडल्याने त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -