Next

कोंकणातील सहलीसाठी नावाजलेले समुद्रकिनारे | Offbeat Beaches You Should Explore Before You Die

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 11:14 AM2021-01-15T11:14:31+5:302021-01-15T11:15:04+5:30

कोकणातील समुद्राची ओढ सगळ्यांनाच असते. उसळणाऱ्या लाटा, फेसाळलेले निळेशार पाणी, किनाऱ्यावरील सोनेरी वाळू, समुद्रातील साहसी खेळ, बोटिंग यामुळे कोकणात अगदी फॉरेन टूरचा फील येतो. कोकणातील वळणदार रस्ते, उंच डोंगर आणि घनदाट झाडी यामुळे उन्हाळा असो किंवा हिवाळा कोकण सगळ्यांना हवाहवासा वाटतो. परदेशातील स्वच्छ व सुंदर बीचप्रमाणे कोकणातही अनेक आकर्षक बीच आहेत. इथे समुद्रात वॉटर स्पोर्ट्स करण्या सोबतच खाण्यासाठीही अनेक पर्याय उपवब्ध आहेत. खास कोकणी पद्धतीचा पाहुणचार घेण्यासाठी दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या इथे वाढत आहे. त्यामुळे तुम्ही जर कोकणांत सहलीसाठी प्लॅन करत असाल तर हा व्हिडीओ नक्की बघा -