केसांचा गुंता सोडविण्यासाठी काही सोप्या टिप्स | Mistakes to Avoid to Stop Hair Breakage
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2021 01:51 PM2021-06-16T13:51:25+5:302021-06-16T13:51:35+5:30
केस धुतल्यानंतर अथवा झोपेतून उठल्यानंतर सर्वात पहिली त्रासदायक गोष्ट म्हणजे केसांचा होणार गुंता. त्यातही केस जर मोठे असतील तर हा गुंता सोडविणे म्हणजे एक सर्वात मोठा टास्क आहे असंच म्हणायला हवं. केसांचा एकदा गुंता झाला की, तो सोडविणे हे महाकठीण काम. त्यातही केस कुरळे असतील तर मग दमछाक होणे नक्कीच. पण तुम्ही केस धुतल्यानंतर अथवा झोपतून उठल्यानंतर अगदी सहजरित्या हा केसांचा गुंता सोडवू शकता. केसांचा गुंता सोडविण्यासाठी काही सोप्या टिप्स देत आहोत. तुम्ही याचा वापर करून सहजपणे केसांचा गुंता आता सोडवा. यामुळे तुमचे केसही तुटणार नाहीत आणि केसांची काळजी व्यवस्थित घेतली जाईल हे निश्चित. काय आहेत हे सोपे उपाय जाणून घेऊया.