Next

भरपेट खाऊन ही वजन कंट्रोल मध्ये कसं ठेवायचं? How to Eat Your Favorite Foods and Still Lose Weight

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2020 04:19 PM2020-12-10T16:19:59+5:302020-12-10T16:20:30+5:30

कोणी नुसतं म्हणायचा अवकाश.. अरे तुझी तब्येत चांगली सुधारलेली दिसतेय.. समोरच्या माणसानं खरोखरच प्रामाणिकपणे आणि चांगल्या अर्थानं ही प्रतिक्रिया दिलेली असली तरी ज्या व्यक्तीला ही प्रतिक्रिया मिळालेली असते, ती व्यक्ती एकदम सजग होते. याचा अर्थ ‘आपण जाड झालोय’ असा सरळ सरळ अर्थ ती व्यक्ती काढते. मग हे खायचं नाही, ते खायचं नाही, या पदार्थाला तर शिवायचंही नाही.. अशा गोष्टी सुरू होतात.. अनेकांना आवडते खाद्यपदार्थ सोडायला खूप जिवावर येतं, तरीही ते त्यावर कंट्रोल ठेवतात, पण खरं तर खाण्यापिण्यावर अतिरेकी कंट्रोल न ठेवताही आपल्याला आपली तब्येत कंट्रोलमध्ये ठेवता येऊ शकते.