Next

केसांमध्ये येणारे फोड असे करा नाहीसे | Pimples On Scalp | How to Treat Acne On Scalp| Hair Treatment

By ऑनलाइन लोकमत | Published: November 6, 2020 09:11 AM2020-11-06T09:11:09+5:302020-11-06T09:11:32+5:30

केसांची निगडीत समस्या महिलांना तसंच पुरूषांना कोणत्याही ऋतूमध्ये उद्भवत असतात. कधी कोंडा होणे, कधी केस गळणे तर कधी केसांमध्ये पुटकुळया उद्भवण्याचा धोका असतो. बऱ्याचदा केसांमध्ये खाज येते आणि त्यानंतर त्याठिकाणी पिंपल्स अथवा फोड येतात. तुम्हालाही ही समस्या जाणवत असेल तर हि माहिती तुमच्याचसाठी आहे. घाम आणि केसामधील कोंडयामुळे डोक्यावर पिंपल्स येत असतात. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत डोक्यावरील केसांमध्ये पिंपल्स येत असल्यास ते घालवण्यासाठी आपण कोण कोणते घरगुती उपाय करू शकतो.