Next

लांबसडक, चमकदार आणि घनदाट केस | Mistakes You Should Avoid For Long & Healthy Hair | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2020 01:44 PM2020-12-14T13:44:37+5:302020-12-14T13:45:01+5:30

लांबसडक, चमकदार आणि घनदाट केस असावेत, अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. पण लांबसडक केसांची देखभाल करताना भरपूर कष्ट घ्यावे लागतात. लांब असलेल्या केसांची काळजी घेण्यासाठी नियमित पुरेसा वेळ देणे आवश्यक आहे. अन्यथा केसांचे नुकसान होण्याची शक्यता असते. काही जणी लांबसडक केस मिळवण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे उपाय करत असतात. तर बहुतांश महिला लांब केसांची देखभाल करण्यासाठी वेळच मिळत नसल्याने आपल्या सुंदर केसांना कात्री लावतात. आता तुमच्या सुंदर केसांना कात्री लागू नये म्हणून तुम्ही काही टिप्स फॉलो करू शकता.