Next

मंगळागौरला आता डिजिटल रूप | Digital Mangala Gouri | Lokmat Sakhi

By ऑनलाइन लोकमत | Published: April 10, 2021 09:50 AM2021-04-10T09:50:15+5:302021-04-10T09:51:16+5:30

झिम्मा, फुगडी, पिंगा या खेळांची नावे आठवली की डोळ्यासमोर येते ती मंगळागौर. श्रावण महिन्यातील मंगळवारी नवविवाहित महिला मंगळागौर खेळत असतात. यासाठी इतर महिलांना बोलावून सकाळी एकत्रित पूजा करतात व त्यानंतर रात्री जागरण करतात. जागरणाच्या वेळी,विविध खेळ खेळण्याचा प्रघात आहे. यंदा मात्र असे कोणतेही खेळ खेळता येणार नाहीत. कोरोनाचे सावट प्रत्येकावर असल्यामुळे मंगळागौर खेळणे तर दूर पण एकत्र जमण्यावरही निर्बंध आहे. त्यामुळे काय करायचे असा प्रश्न असताना पुण्यातल्या परंपरा गृपने मात्र डिजिटल मंगळागौर साजरी करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी त्यांनी गेले दोन महिने वेगवेगळ्या शहरातील महिलांना मंगळागौरीचे प्रशिक्षण दिले असून आता त्याचा एकत्र व्हिडीओ सोशल मीडियावर रिलीज केला जाणार आहे. त्यामुळे घरबसल्या मंगळागौरीचा आनंद मिळणार आहे.

टॅग्स :डिजिटलdigital