Next

Navratri Diet Plan | Weight Loss During Navratri | नवरात्रीत ३ - ५ किलो वजन कमी करणे शक्य?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2020 05:03 PM2020-10-16T17:03:59+5:302020-10-16T17:04:25+5:30

आजकाल सर्वांना खूप टेन्शन आहे ते म्हणजे वजन कमी करण्याचं... पोटाचा घेर कमी करण्याचं... एवढच नाही तर healthy कसं राहता येतील त्याचा सुद्धा स्ट्रेस अलीकडे १५-१६ वर्षांची मुलं घेताना दिसतात... काही जण डाएट फॉलो करत तर काही जण उपवास करतात... व्यायाम किंवा डाएटचा श्रीगणेशा करण्यासाठी अनेकजण निमित्ताच्या शोधात असतात. कुणी वाढदिवस, कुणी नवीन महिन्याची पहिली तारीख, कुणी नवं वर्षारंभ, तर कुणी विशेष सणवार पाहून नियोजन करतात. या मानवी स्वभावानुसार नवरात्रीचा सणही डाएट ठरवण्याच्या दृष्टीनं महत्त्वाचा ठरतो आहे. नऊ दिवस उपवासाच्या निमित्तानं डाएट प्लॅन आखण्याचाही विचार केला जातो आहे. या नऊ दिवसांतला आहार शरीरासाठी योग्य ठरल्यास, तोच प्लॅन वर्षभर पाळणं शक्य होतं.