आता गेमिंग मोबाईल २५००० रुपयांच्या आत | Buy Gaming Mobile Phones Under 25 Thousand Rupees | Realme
By ऑनलाइन लोकमत | Published: February 23, 2021 10:17 AM2021-02-23T10:17:50+5:302021-02-23T10:18:05+5:30
गेल्या काही वर्षांत, विशेषतः भारतात मोबाइल गेमरच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यात कोरोना असल्याकारणाने, लोक व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी मुख्यतः घरीच राहिले आणि नेहमीपेक्षा जास्त ऑनलाइन्स गेम खेळले गेले. बर्याच जणांनी कॅज्युअल गेमिंगचा सहारा घेतला, तर काहींनी त्यांच्या स्मार्टफोनवर फर्स्ट पर्सन शूटर (एफपीएस) गेम्स, बॅटल रॉयल गेम्स आणि इतर स्ट्रॅटेजी-आधारित गेम्स खेळण्याचा प्रयत्न केला. यामुळे, आता, मोबाईल फोन्स जे गेम्सना सपोर्ट करु शकतील, अशा फोनची मागणी वाढलीये. बहुतेक लोकांना फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करणे परवडत नाही, त्यामुळे मोबाइल फोन कंपन्या आणि चिप निर्मात्यांनी उत्तम गेमिंगचा अनुभव देण्यासाठी मिड-रेंज फोनवर अधिक लक्ष केंद्रित केलं आहे. जर तुम्हाला २५ हजार रुपयांपेक्षा कमी गेमिंग स्मार्टफोन विकत घ्यायचा असेल, यासाठी हा व्हिडीओ नक्की पहा