आरोग्यासाठी बेस्ट ठरेल 'हे' तेल This oil will be the best for health | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2020 10:50 AM2020-10-20T10:50:55+5:302020-10-20T10:51:25+5:30
आपण आपल्या फिटनेसला घेऊन टेन्शन मध्ये असो किंवा नसो. पण आपल्या घरी मात्र पौष्टिक अन्न कसं बनेल आणि ते योग्य तेलाचं बनेल का याची एक वेगळीच चिंता असते. आता तर काही लोकांचा असा विश्वास आहे की निरोगी आहार हा तेल मुक्त आहार असतो म्हणजे तेलाचा वापर करून बनवलेले पदार्थ खाणंच टाळतात. योग्य प्रकारचे तेल निवडल्यास असंख्य मार्गांनी शरीरास फायदा होतो असे देखील म्हणण्यात आले होते. लोणी आणि तूप व्यतिरिक्त स्वयंपाकाच्या तेलाचे काही आरोग्यदायी पर्याय देखील आहेत, म्हणजेच बटर आणि तूप शिवाय खाण्याचे काही तेल नक्कीच फायदेशीर ठरू शकतात.