भेंडीच्या पाण्याने White Discharge चा त्रास होईल कमी | White Discharge Solution | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2020 02:14 PM2020-12-24T14:14:25+5:302020-12-24T14:15:04+5:30
प्रत्येक बाईला पांढऱ्या स्त्रावाचा समस्येतून जावं लागतं. ही समस्या किंवा हा त्रास एक अतिशय सामान्य बाब आहे. प्रत्येक मुलीला किंवा बायकांना अनेक प्रकारच्या समस्या होऊ लागतात. अश्या बऱ्याच समस्या असतात ज्या आपण कोणाला ही सांगू शकत नाही. त्याबद्दल बोलू शकत नाही. ज्याबद्दल बोलल्यावर देखील अस्वस्थता जाणवते. अश्याच काही त्रासांपैकी एक आहे ते म्हणजे ल्युकोरिया (Likoria). याला पांढरे पाणी, व्हाईट डिस्चार्ज किंवा श्वेत प्रदर देखील म्हणतात. हा त्रास बायकांना मासिक पाळी येण्याचा काही दिवस पूर्वी किंवा पाळी आल्यावर जाणवतो. तसेच काही बायकांना याचा फार त्रास होतो. त्यांना दररोज या समस्येला सामोरी जावं लागतं. हा आजार प्रामुख्यानं अशक्तपणा, पोषक तत्त्वांची कमतरता झाल्यामुळे होतो. या त्रासापासून वाचण्यासाठी औषध आणि घरगुती उपाय दोन्ही ही प्रभावी आहेत. आजच्या video मध्ये जाणून घेऊयात काही सोपे घरगुती उपाय...