Next

सुंदर, मजबूत केसांसाठी कांद्याची पावडर फायदेशीर | Hairfall- How To Make Onion Powder? How To Use It?

By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2020 05:55 PM2020-12-28T17:55:17+5:302020-12-28T17:55:43+5:30

केस म्हंटल तर आपण सर्वच काही ना काही घरगुती उपाय करत असतो. मुळात natural उपाय हे आपल्या side effects पासून दूर ठेवतात. आता केसांसाठी अलीकडे खूप trend करतंय ते म्हणजे कांदा. कांद्याचं तेल त्याची जाहिरात आपण पाहत असाल? बरोबर... का माहितेय? कारण कांद्याचा अर्क हा केसांच्या वाढीसाठी फारच चांगला असतो. म्हणूनच हल्ली कांद्याचा तेल, कांद्याचा पॅक आणि कांदा सीरम असे वेगवेगळे प्रॉडक्ट वापरले जातात. सुंदर, जाड, सिल्की, मजबूत केसांसाठी कांद्याचा उपयोग करायचा विचार करत असाल तर तुम्ही कांदा पावडरचा उपयोग करु शकता. कांद्याची पावडर बाहेरुन आणायची गरज नाही ही कांदा पावडर तुम्ही घरीच करु शकता. ही कांदा पावडर कशी बनवायची आणि त्याचा वापर कसा करायचा ते देखील जाणून घेऊया.