चिंचोली गावातील मोर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात | Peacock Village in Maharashtra | Morachi Chincholi
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 11:14 AM2021-01-27T11:14:22+5:302021-01-27T11:15:57+5:30
अष्टविनायकापैकी रांजणगाव गणपतीपासून साधारण २३ किमी अंतरावर चिंचोली गाव आहे. चिंचोली गावातील मोर हे पर्यटकांच्या आकर्षणाचे बिंदू आहे. त्यामुळे या गावाचे नाव ‘मोराची चिंचोळी असे आहे. चिंचोली गावातील मोर पर्यटकांचं लक्ष वेधून घेतात. चिंचोलीतील उत्तम जैववैविध्यामुळे पूर्वीपासूनच येथे मोर मोठ्या संख्येने वास्तव्यास होते. दिसायला अत्यंत देखणा, आकर्षक असलेला हा पक्षी देवाचे वाहन असून, आपल्या गावाचे वैभव आहे, अशी गावातील पूर्वजांची समजूत होती. त्यामुळे त्यांनी कधीच त्यांचा शिकार केली नाही. उलट मोरांचा अधिवास टिकून राहावा, यासाठी त्यांनी शेताभोवती मोरांना आकर्षित करणारी झाडे लावली आहेत.