फ्लेमिंगोंमुळे पाण्यावर गुलाबी चादर | Navi Mumbai Pink Flamingo Sanctuary | Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2021 11:29 AM2021-01-12T11:29:18+5:302021-01-12T11:29:39+5:30
ठाणे, नवी मुंबई व पनवेल अशा विस्तीर्ण भागात पसरलेल्या खाडीकिनाऱ्यावरील वातावरण फ्लोमिंगो पक्षासाठी पोषक असतं. थंडीत मोठ्या संख्येने फ्लेमिंगो इथे येतात. नवी मुंबई शहराच्या पश्चिमेला असलेल्या खाडीत फ्लेमिंगोची गुलाबी चादर पसरली असल्याने लहान-थोरांची पावले तिकडे वळू लागली आहेत. अशातच ठाण्याच्या जवळ असलेलं आणि नवी मुंबईतील ऐरोली या ठिकाणी वनविभागाने सुरू केलेली फ्लेमिंगो सफारी रोज हाऊस फूल होताना दिसत आहे.