Simple Tips To Avoid Diabetes | डायबेटीस होऊ नये म्हणून युवकांनी काय करावं? Lokmat Oxygen
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2020 03:03 PM2020-10-13T15:03:26+5:302020-10-13T15:03:52+5:30
तुम्हाला बाहेरच खाणं खूप आवडतं असेल, किंवा तर सतत प्रोसेस्ड फूड खात असाल...तर ते घातक ठरू शकतं. बऱ्याच वेळेला युवकांना पाणी पिण्याची सुद्धा आठवण राहत नाही. मुळात काय तर बदललेली जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि अयोग्य आहारांमुळे आज मधुमेह रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. युवकांमध्ये देखील त्याची वाढ होतेय. एकदा मधुमेहाचा आजार पाठीमागे लागल्यास भविष्यात अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. म्हणून हा आजारच होऊ नये यासाठी प्रत्येकाने आपल्या आरोग्याची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे. धकाधकीच्या जीवनातून तुम्हाला काही वेळ स्वतःसाठी काढणं अत्यंत गरजेचं आहे.आजच्या video मध्ये जाणून घेऊयात मधुमेहापासून वाचण्यासाठी म्हणजेच मधुमेह होऊ नये म्हणून काय काळजी घ्यायला हवी आणि हो शेवटी एक महत्वाची टीप देखील आम्ही देणार आहोत...