Next

विमानतळासारखे सोयी सुविधा देणारे प्रतिक्षालय रेल्वे स्टेशनवर पण.. | CSMT Namah Waiting Lounge

By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2020 06:02 PM2020-10-31T18:02:28+5:302020-10-31T18:03:18+5:30

मुंबईतील नामांकित असे रेल्वे स्टेशन असणारे छत्रपती शिवाजी महराज टर्मिनसावर प्रवाशांना आता आंतरराष्ट्रीय विमानतळासारख्या सोयीसुविधा मिळणार आहेत. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसावर मोठ्या प्रमाणात बाहेरगावी जाणा-या गाड्यांची वर्दळ असते. त्याचबरोबर स्थानिक मुंबईकरांची देखील या स्थानकावर लोकल ट्रेनसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी असते. त्यामुळे या स्थानकावर आता आंतरराष्ट्रीय विमानतळावर ज्या प्रकारचे प्रवाशांसाठी प्रतिक्षालय आहेत अगदी तशाचप्रकारचे प्रतिक्षालय या ठिकाणी बांधण्यात आले आहे. चला तर मग या व्हिडीओच्या माध्यमातून आपण छत्रपती शिवाजी महराज टर्मिनसवर बांधण्यात आलेले Namah Waiting Loungeची सफर करूया -