Next

हिवाळयात कोमट पाणी पिण्याचे काय फायदे | Drink More Water To Boost Your Immunity | Winter 2020 |

By ऑनलाइन लोकमत | Published: November 12, 2020 02:38 PM2020-11-12T14:38:00+5:302020-11-12T14:38:23+5:30

आरोग्य तज्ञ म्हणतात की, उन्हाळ्यात एखाद्या व्यक्तीने दररोज किमान 8 ते 10 ग्लास पाणी प्यायला हवं. परंतु, हिवाळ्यात मात्र तहान कमी लागत असल्याने, इतके पाणी पोटात जाणे कठीणच होते. यामुळे, शरीर डीहायड्रेट होण्यास सुरुवात होते आणि यामुळे आरोग्यास मोठ्या प्रमाणात हानी पोहोचू शकते. म्हणूनच हिवाळ्यातही आपल्याला शरीराला भरपूर पाण्याची गरज भासते. मानवी शरीरामध्ये तब्बल 70 टक्के पाणी असतं. जे पेशी, अवयव आणि शरीरातील टिशूसोबत ऑक्सिजन पातळीला रेगुलेट करण्याचं काम करतं. आपल्या शरीराचे तापमान संतुलित राखण्यासाठी हिवाळ्यात भरपूर पाणी प्यावं. तसं बघायला गेलं तर कोमट पाणी प्यायल्याने आजारांपासून स्वतःचा बचाव देखील करता येतो. हिवाळ्यात भरपूर पाणी पिऊन तुम्ही बऱ्याच समस्यांना दूर ठेवू शकता... रोगप्रतिकारशक्ती वाढण्यासोबतच हिवाळयात कोमट पाणी पिण्याचे अजून काय काय फायदे होतात पाहुयात या विडिओ मधून पण आधी लोकमत oxygen च्या fb पेज ला लाईक करा आणि yt चॅनेल ला subscribe करायला विसरू नका.