Next

नाशिकमध्ये सर्वात लोकप्रिय ठिकाणं कोणती? Places To Visit In Nashik | Nashik Tour | Lokmat Oxygen

By ऑनलाइन लोकमत | Published: February 14, 2021 11:04 AM2021-02-14T11:04:01+5:302021-02-14T11:04:19+5:30

नाशिक- Wine Capital ऑफ India! नाशिकची द्राक्षं जगभरात प्रसिद्ध आहेत. ज्यामुळे आता आंतरराष्ट्रीय स्तरावर नाशिकला उत्तम दर्जाच्या दाक्षं आणि वाईनसाठी ओळखलं जातं. शिवाय नाशिक हे गोदावरीच्या कुशीत वसलेलं एक तिर्थक्षेत्रदेखील आहे. महाराष्ट्रातील अनेक प्रसिद्ध मंदिरे नाशिकमध्ये आहेत. ज्यामुळे नाशिकला पर्यटक आणि भाविकांची नेहमीच वर्दळ असते. कुंभमेळा हा भारतातील एक सर्वात मोठा धार्मिक उत्सव असतो. असं म्हणतात की, समुद्रमंथनातून अमृतकुंभ बाहेर पडला आणि देव आणि दानवांमध्ये या अमृतावरून युद्ध झाले. या युद्धात त्या अमृतकुंभातील काही थेंब पृथ्वीवर पडले. त्यातील एक हरिद्वार येथील गंगा नदीत, दुसरा थेंब उज्जैनमधील क्षिप्रा नदीत, तिसरा थेंब प्रयागमधील गंगा, यमुना व सरस्वतीच्या संगमावर नदीत तर चौथा थेंब नाशिकमधील गोदावरी नदीत पडला होता. ज्यामुळे या ठिकानांना धार्मिक स्थळांची मान्यता मिळाली. नाशिक फिरायचं म्हंटल तर तसं ते मोठं आहे... पण काही विशेष अशी ठिकाणं आहेत जी प्रत्येक पर्यटक आणि traveller च्या लिस्ट मध्ये असतातच... चला तर मग जाणून घेऊयात नाशिक मध्ये सर्वात लोकप्रिय ठिकाणं कोण कोणती आहेत ती.