हरिहरेश्वरला फिरायला जाण्याचं नेमकं कारण काय? Why We Should Visit Harihareshwar? Konkan Trip
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2021 11:13 AM2021-04-01T11:13:55+5:302021-04-01T11:14:31+5:30
कोकण किनारपट्टीवरील हरिहरेश्वर हे एक निसर्गरम्य आणि पवित्र तीर्थस्थान आहे. हरिहरेश्वर गावात हरिहरेश्वर, कालभैरव योगेश्वरी, सिद्धिविनायक आणि हनुमान अशी चार मुख्य मंदिरे देखील आहेत. समुद्रकिनाऱ्यानजीक विष्णूपद, गायत्रीतीर्थ, वक्रतीर्थ, सूर्यतीर्थ, यज्ञकुंड, विष्णुतीर्थ अशी अनेक ठिकाणे आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे एकूण १०८ तीर्थस्थानांपैकी प्रमुख तीर्थक्षेत्र म्हणून हरिहरेश्वरलाच मानले जाते. त्यामुळे आज आपण निसर्गसौंदर्याने नटलेल्या हरिहरेश्वर या पर्यटन स्थळाबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.