Koo App घेणार का Twitter ची जागा? Twitter Alternative Koo App | Will Koo App Replace Twitter?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 05:21 PM2021-02-17T17:21:28+5:302021-02-17T17:21:52+5:30
अलीकडे स्वदेशी अँप्स चा trend आलाय... प्रत्येक विदेशी अँप साठी स्वदेशी अँप लाँच होतायेत... whatsapp ला पर्याय म्हणून telegram आणि signal अँप कडे लोक वळताना दिसले ...त्याच शर्यतीत आता twitter च्या जागी Koo App उतरलाय...भारत सरकार आणि ट्विटर यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू होता. शेतकरी आंदोलन आणि खालिस्तान समर्थकांशी संबंधित काही अकाउंटवर बंदी घालण्यासाठी सरकारने ट्विटरला पत्र लिहिले होते. ट्विटरने यातील काहींवर कारवाई करण्यास नकार दिला होता. याच दरम्यान, स्वदेशी ट्विटर म्हणून ओळखल्या जाणार्या कू अॅपला चालना मिळाली आहे. आता इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालय (MeiTY) आणि इतर अनेक सरकारी विभागांनी आपले अकाउंट कू अॅपवर तयार केली आहेत. इतकंच काय तर 7 दिवसात या अँप च्या डाऊनलोडच्या संख्येत 10 पटीनं वाढ झालीये! एका मीडिया रिपोर्ट नुसार, मागील काही दिवसांपूर्वी, सात दिवसांमध्ये App डाऊनलोड करणाऱ्यांची संख्या 10 पटीनं वाढली. गूगल प्ले स्टोरवर डाऊनलोडची संख्या 10 लाखाहून अधिक दिसत आहे.