विठ्ठला राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दे - चंद्रकांत पाटील
By ऑनलाइन लोकमत | Published: October 31, 2017 07:04 AM2017-10-31T07:04:57+5:302017-10-31T07:05:27+5:30
पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक श्री विठ्ठल-रुक्मिणीची भक्तीमय वातावरणात शासकीय महापूजा केली. यावेळी चंद्रकांत पाटील यांनी कार्तिकी यात्रेच्या एकादशी सोहळ्या दिवशी विठ्ठल-रुक्मिणीची पूजा करण्याची संधी मिळाली आहे. राज्यातील शेतक-याचे उत्पादन वाढू दे, त्यांच्या उत्पादनाला चांगला भाव देण्याची आमची क्षमता वाढू दे, असे साकडे घातल्याचे सांगितले.