पिंपरी - गणेशोत्सवाचे आद्य संस्थापक लोकमान्य टिळक की भाऊ रंगारी या सध्या सुरू असलेला वाद मुळात वांझोटा आहे. रंगारींनी घरातला गणपती, सार्वजनिक गणपती म्हणून रस्त्यावर आणला असेल तर त्या उत्सवाचे पहिले श्रेय त्यांना द्यायलाच हवे. महापुरूषांमध्ये जसे सामर्थ्य असते, तसेच मर्यादाही असतात, याचं भान समाजात जोपर्यंत येत नाही, तोपर्यंत असले वांझोटे वाद सुरूच राहतील, असे डॉ. श्रीपाल सबनीस यांनी सांगितले.