शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज लोकमत महाराष्ट्र ऑफ द इयर सोहळ्यात पॉवर आयकॉन म्हणून गौरवण्यात आलं. हा पुरस्कार स्वीकारल्यानंतर उद्धव यांना उरी स्टाईलमध्ये उपस्थितांना हाऊ इज द जोश असा प्रश्न विचारला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी अतिशय सकारात्मक प्रतिसाद दिला. युतीच्या घोषणेनंतर उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस आज पहिल्यांदाच एका मंचावर उपस्थित होते.